तपासादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याने महिलेची अंतर्वस्त्र चोरल्याचा प्रकार ब्रिटनमध्ये उघडकीस आला होता. याप्रकरणी आता न्यायालयाने संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला चार महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. मार्सिन जिलिंस्की असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. विशेष म्हणजे ही घटना गेल्या वर्षीची असून संबंधित महिलेने त्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे ही घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.