

viral ias
esakal
Vaishali DM IAS Varsha Singh: बिहारच्या वैशाली जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आयएएस वर्षा सिंह यांनी आपल्या कर्तव्यदक्षतेने आणि संवेदनशीलतेने नागरिकांची मने जिंकली आहेत. गंडक नदीच्या वाढत्या जलपातळीमुळे लालगंज परिसरातील युसूफपूर पंचायतीच्या पिरापूरमधील रिंग बंधाऱ्याला अनेक ठिकाणी गळती लागली होती. ही माहिती मिळताच त्या तात्काळ रात्रीच घटनास्थळी पोहोचल्या.