Viral Video : ताशी १८० किमी वेगाने धावली वंदे भारत ट्रेन, इंजिनमध्ये ठेवलेल्या ग्लासातून एक थेंबही पाणी सांडले नाही, पाहा व्हिडिओ

Vande Bharat Speed Test : ट्रेनच्या ९०८ टन वजनासह विविध ब्रेकिंग आणि ऑसिलेशन चाचण्या पार पडल्या.चाचणीचे निरीक्षण आरडीएसओ (RDSO) च्या तज्ज्ञांनी केले. या यशामुळे भारतात उच्च वेगाच्या ट्रेनचे नियमित संचालन शक्य होण्याची शक्यता वाढली.
Vande Bharat Speed Test

Vande Bharat Sleeper Train successfully completes a 180 kmph high-speed trial with a glass of water remaining perfectly still in the driver’s cabin

esakal

Updated on

Vande Bharat Train: देशातील अत्याधुनिक आणि लोकप्रिय ट्रेन 'वंदे भारत' ने एक नवा विक्रम केला आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनने ताशी १८० किलोमीटर वेगाने धावण्याची चाचणी पूर्ण केली आहे.वंदे भारत इतक्या गतीने धावत असतान लोकोपायलट् च्या केबिनमध्ये ठेवलेल्या पाण्याच्या ग्लासमधून एकही थेंबही सांडला नाही, ज्यामुळे ट्रेनची स्थिरता आणि डिझाइनची ताकद सिद्ध झाली. या चाचणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि लोक भारतीय रेल्वेच्या कामगिरीचे कौतुक करत आहेत. ही चाचणी २ नोव्हेंबर रोजी सुरू झाल्या आणि १७ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com