
मालाडमध्ये हफ्ता न दिल्याने पोलिसांनी पान विक्रेत्याला मारहाण केली
समता नगर पोलिस आणि एमएसएफ कर्मचाऱ्यावर विभागीय चौकशी सुरू.
पीडित विक्रेता खासगी रुग्णालयात उपचार घेत असून, जनतेचा रोष वाढला.
Malad Police Viral Video : मालाड पूर्वेतील कुरार परिसरातील गांधी नगरमध्ये ४० वर्षीय पान-सुपारी विक्रेत्याला हफ्ता न दिल्याने दोन पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समता नगर पोलीस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (एमएसएफ) कर्मचाऱ्याने ही मारहाण केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या प्रकरणामुळे पोलिसांवर गंभीर आरोप होत असून विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.