Viral Video : नाद खुळा! पठ्ठ्याने बनवली 7 सीटर इलेक्ट्रिक बाईक; मोठमोठे उद्योजक हैराण

हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.
Viral Video
Viral VideoSakal

भारतात जुगाडू लोकांची कमी नाही. फक्त या टॅलेंटला बाहेर येण्यासाठी योग्य ती संधी मिळायला हवी असं अनेकजण म्हणतात. तर काही तरूण जुगाड करून वस्तू बनवत असतात. सध्या अशाच एका जुगाडू तरूणाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याने चक्क सौरउर्जेवर चालणारी सात सीटाची गाडी तयार केली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तयार केलेल्या गाडीवर सात मुलं बसलेली आहेत. ही गाडी पुर्णपणे सौरउर्जेवर चालणारी असून दोनशे किलोमीटरपर्यंत जाऊ शकते असं व्हिडिओमधील तरूणाने सांगितलं आहे. ही गाडी बनवण्यासाठी ८ ते १० हजार रूपयांचा खर्च आला असून यामधील सगळ्या वस्तू भंगारातील असल्याचं या तरूणाने सांगितलं आहे.

Viral Video
Akshaya Tritiya 2023: उत्सव अक्षयदानाचा

उद्योजक हर्ष गोयंका यांनी हा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्वीटरवरून शेअर केला आहे. "भंगारातील वस्तू आणि सौरउर्जेपासून चालणाऱ्या नवीन गाडीच्या काटकसरीच्या नवकल्पनांमुळे मला आपल्या भारताचा अभिमान वाटतो!" असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहीलं आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर शेअर केला आहे. तर यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नेटकऱ्यांकडून या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

सोशल मीडिया हे सध्या मनोरंजनाचे साधन बनले असून यावर अनेक विनोदी, डान्स, सीसीटीव्ही, लग्न, युवक युवतीचे, जुगाडाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजन करतात तर काही व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जात असतात. व्हायरल होणारे व्हिडिओ पाहून किंवा इंस्टाग्रामवरील रील पाहून अनेकजणांचा दिवस आनंदात जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com