

Emotional Wedding story from Kerala : केरळमध्ये एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला त्यांना शाहिद कपूर आणि अमृता राव यांच्या विवाह सिनेमातील प्रसंगाची आठवण झाली. एका नवरीचा तिच्या लग्नाच्या दिवशी अपघात झाला. तिला पाठीच्या कण्याला दुखापत झाली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. नवरदेवाने कुटुंबाला हे कळताच, वराने लग्न रद्द करण्याऐवजी त्याच शुभ तारखेला करण्याचा निर्णय घेतला. वधूच्या कुटुंबानेही सहमती दर्शवली आणि जोडप्याने रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये लग्न केले.