

A heartwarming moment where a young girl offers money to an elderly beggar, who returns it with a smile, symbolizing true humanity and kindness.
esakal
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. एक अतिशय वृद्ध माणूस मळकट कपडे आणि चादर पांघरुन जमिनीवर वाकलेला बसला आहे. त्याच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर वयाचे परिणाम स्पष्टपणे दिसत आहेत. तो मदत मागण्यासाठी हात पुढे करतो. तेवढ्यात दोन लहान मुली जवळ येतात. एका मुलीने गुलाबी रंगाचा जॅकेट आणि पांढरा पँट घातली आहे, तर दुसरीने पिवळा शर्ट घातला आहे. गुलाबी रंगाचा जॅकेट घातलेली मुलगी खूप निष्पाप दिसते. हसत ती त्या माणसाजवळ जाते आणि तिच्या खिशातून १० रुपयांची नोट काढते. ती प्रेमाने त्याच्या हातात नोट ठेवते.