
सध्या एक प्रेमपत्र सोशल मिडियावर व्हायरल होत आहे
हे प्रेमपत्र आहे ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये ट्रेनिंग केलेल्या आर्मी ऑफिसरचे.
हे पत्र त्यांना तांच्या प्रेयसिने लिहिले होते जेव्हा ते ट्रेनिंगला होते
Viral Love Letter : लोकांना नेहमीच आर्मी, सेनेचे अधिकारी, त्यांचे जीवन आणि त्यांची प्रेम कहाणी यामध्ये रस असतो. तर अशीच एक लव स्टोरी व्हायरल होत आहे. चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीतून (OTA) एक हृदयस्पर्शी कहाणी समोर आली आहे जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कॅप्टन धर्मवीर सिंग यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेले एक हस्तलिखित प्रेमपत्र नेटकऱ्यांच्या मनाला भिडले आहे. १० डिसेंबर २००१ या तारखेला लिहिलेले हे पत्र त्यांच्या तत्कालीन प्रेयसी जी आता त्यांच्या पत्नी आणि प्रेमाने ‘ठकुराइन’ म्हणून ओळखल्या जातात त्यांनी पाठवले होते.