Viral News : एकदा माणूस 'या' दरीत गेला तर परत कधीच येत नाही; काय आहे रहस्य?

आज आपण अशाच एका दरी विषयी जाणून घेणार आहोत जिथे एकदा माणूस गेला तर परत कधीच येत नाही. चला तर जाणून घेऊया.
Viral News
Viral Newssakal

Shangri La Ghati : निसर्गाने अनेक रहस्यमय गोष्टी बनवल्या ज्याचा प्रत्यय आपल्याला नेहमी येत असतो. जगातील काही रहस्यमय गोष्टी अशा आहेत जे आजही प्रश्न निर्माण करतात. जगातील अशा अनेक गोष्टी आहेत जे ऐकून किंंवा वाचून कोणाच्याही अंगावर काटा येणार. आज आपण अशाच एका दरी विषयी जाणून घेणार आहोत जिथे एकदा माणूस गेला तर परत कधीच येत नाही. चला तर जाणून घेऊया. (Viral News read about Mysterious the valley Shangri la ghati)

आज आपण एका रहस्यमयी दरीविषयी जाणून घेणार आहोत. असं म्हणतात की या दरीला आजपर्यंत कोणीही शोधू शकलेला नाही. तुम्ही म्हणाल जर कोणी या दरीला शोधू शकला नाही तर या दरीविषयी तुम्हाला कसं माहिती? एका रिपोर्टनुसार ही दरी अरुणाचल प्रदेश आणि तिबेटच्या मध्ये आहे. या दरीला 'शांगरी-ला घाटी' म्हणतात. याची गणती वायुमंडलच्या चौथ्या आयाममध्ये केली जाते.

Viral News
Viral News : धक्कादायक! बायकोने चक्क रागात दाताने नवऱ्याची जीभ तोडली, 15 टाके घालूनही...

बरमूडा ट्रॅंगल सारखी आहे ही रहस्यमय घाटी
या दरीला बरमूडा ट्रँगलसारखी जगातील रहस्यपूर्ण ठिकाण मानले जाते. बरमूडा ट्रँगल नॉर्थ अटलांटिक महासागरचा तो भाग आहे ज्या ठिकाणाहून जाणारे जहाज आणि विमान दिसेनासे होतात.

'शांगरी-ला घाटी' ला म्हटले जाते की या दरीचा सरळ संबंध दूसऱ्या जगाशी आहे. असमिया साहित्यकार अरुण शर्माच्या 'तिब्बत की वह रहस्यमय घाटी' या पुस्तकात याचा उल्लेख केलाय.

रहस्यमयी प्रकाशाचं घर 

या दरीचा उल्लेख तिबेट भाषा मध्ये 'काल विज्ञान' मध्ये मिळतं. तिबेटच्या विद्वान युत्सुंगचं म्हणणं आहे की ते या रहस्यमय दरीत गेले होते. त्यांच्या मते तिथे ना सुर्य प्रकाश होता आणि ना चंद्राचा प्रकाश मात्रा चोहीकडे एक वेगळा अनोखा प्रकाश होता.

Viral News
Viral Video : अररर... कोल्ड्रिंक्सचा कंटेनर उलटला अन् कोल्हापुरकरांनी दिवसाढवळ्या...

इस दरीला पृथ्वीचं आध्यात्मिक नियंत्रण केंद्र पण म्हटले जाते. सोबतचा याला सिद्धाश्रमपण म्हटले जाते ज्याचा उल्लेख हिंदू धर्माच्या ग्रंथात महाभारतपासून वाल्मिकी रामायण आणि वेदांमध्ये केला गेला आहे.

चीनी सेनानेही या रहस्यमयी दरीला शोधण्याचा प्रयत्न केलाय मात्र ते शोधू शकले नाही. अनेक रिपोर्ट्स म्हणतात की जगभरात 'शांगरी-ला घाटी' च्या रहस्याविषयी ज्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्या लोकांचाही पुन्हा शोध लागला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com