Viral Photo : 'या' व्हायरल फोटोमुळे कदाचित तुम्हीही पॉपकॉर्न खाणं सोडाल; हे वाचाच

सिनेमाच्या मूडनुसार पॉपकॉर्नचाही मूड बदलतो असं अनेक नियमित पॉपकॉर्न, सिनेमा कॉम्बिनेशन करणाऱ्यांचं म्हणणं आहे.
Viral Photo
Viral Photo esakal

Popcorn In Horror Movie Viral Photo : सिनेमा घरात बघा नाहीतर अगदी थिएटरमध्ये जाऊन. पॉपकॉर्न आणि मूव्ही हे अढळ कॉम्बिनेशन आहे. जर सिनेमा बघताना तुम्ही पॉपकॉर्न नाही खाल्लेत तर सगळच वाया गेलं असं समजलं जातं. त्यामुळे सिनेमा हिट आहे की, फ्लॉप, हॉरर असो किंवा कॉमेडी पॉपकॉर्न जोडीला असायलाच हवं.

Viral Photo
Viral Photo esakal

पॉपकॉर्नशिवाय सिनेमाला मजाच येत नाही. त्यामुळे समोसे, कॉफी, कोल्ड्रींक असे वा नसो पॉपकॉर्न हवेच. या सगळ्यात सिनेमाच्या मूडनुसार पॉपकॉर्नचाही मूड बदलतो असं अनेक नियमित पॉपकॉर्न, सिनेमा कॉम्बिनेशन करणाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच इमोशनल सीनला अगदी डोळ्यांच्या कडा पुसत, नाक पुसत पॉपकॉर्न खाण्याची मजाच वेगळी असते. तेच कॉमेडी सीनला हसता हसता पॉपकॉर्न खाताना लागलेला ठसका सुध्दा आनंद देणारा ठरतो.

Viral Photo
Viral Photo esakal

पण तेच जर तुम्ही हॉरर मूव्ही बघत असाल तर सावधान. कारण सिनेमातली भूतं पॉपकॉर्नमध्ये दिसू लागली तर... सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. आपण जेव्हाही भूताचा सिनेमा बघतो तेव्हा अगदी शेजारी बसलेल्या व्यक्तीपासून ते एकट्यात कुठेही जाताना, झोपताना, काही खाताना सगळीकडेच तसेच भास होत असतात. पण तेच भूत तुमच्या हातात दिसायला लागलं तर..?

सध्या व्हायरल होत असलेल्या या फोटोमुळे कदाचीत तुम्हीही पॉपकॉर्न खाणं सोडाल. कारण या फोटोत तुम्ही बघू शकाल की, हॉरर पिक्चर बघितल्यावर जिथे तिथे दिसणारं भूत आता तुम्हाला पॉपकॉर्नमध्येही दिसू लागेल.

Viral Photo
Viral Photo esakal

सध्या हा फोटो मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. आणि एकीकडे पहिला रिप्लाय बाप रे... असाच येतो आणि मग पुढे स्वतःवर हसून स्माईली पाठवल्या जात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com