A mother discovers bundles of cash and coins inside her son’s school bag
esakal
Trending News
Viral Video: मुलाच्या स्कूल बॅगमध्ये लंच बॉक्स ऐवजी नोटांचे बंडल, पाहून आईला धक्का; सत्य समजल्यावर तरळले आनंदाश्रू, हृदयस्पर्शी व्हिडिओ
Kid Savings Video : आईला मुलाच्या बॅगेत लंच बॉक्सऐवजी नोटांचे बंडल आणि नाणी सापडली.सुरुवातीला तिला धक्का बसला, पण सत्य कळल्यावर ती भावूक झाली. मुलाने स्वतःच्या मेहनतीने आणि बचतीने पैसे जमवले होते.
Trending News: मुलगा नेहमी प्रमाणे शाळेतून परतल्यावर आई त्याची स्कूल बॅग तपासत होती.पण तिला मुलाचा लंच बॉक्स मिळाला नाही. मात्र बॅगचा बाजूचा कप्पा भरलेला आणि फुगलेला दिसला. तिने बॅग उघडली तेव्हा तिला जेवणाच्या डब्याऐवजी नोटांचे बंडल अन् काही चिल्लर सापडली. हे पाहून आईला धक्का बसला पण सत्य समजल्यावर तिने आपल्या मुलाचे कौतुक केले. सोशल मीजियावर हा व्हिडिओ खूप व्हायर होत आहे. अन् लोकही मुलाची प्रशंसा करत आहे. व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया

