

A viral classroom video captures a shocking moment where a student physically assaults a math teacher over exam marks, sparking nationwide outrage.
esakal
Teacher Harassment Case : सोशल मीडियावर सध्या एका व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे जो पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एका वर्गात एक विद्यार्थी अचानक त्याच्या जागेवरून उठून गणिताच्या शिक्षिकेशी भांडू लागला. तो आधी शिक्षिकेला थप्पड मारु लागला आणि नंतर लाथा बुक्क्यांनीही मारहाण केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, वर्गातील इतर विद्यार्थिनी शिक्षिकेच्या बचावासाठी आल्या तेव्हा त्या विद्यार्थ्याने त्यांच्यावरही हल्ला केला. गणितात कमी गुण मिळाल्याने नाराज झालेल्या विद्यार्थ्याने वर्गात शिक्षिकेवर हल्ला केल्याचे वृत्त आहे.