Viral video: रंगेहात सापडला 180 किलोचा बहुरूपी पोलीस निरीक्षक, टोल टॅक्स वाचवण्यासाठी.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral video

Viral video: रंगेहात सापडला 180 किलोचा बहुरूपी पोलीस निरीक्षक, टोल टॅक्स वाचवण्यासाठी..

180 Kg Fake Police Inspector: टुंडलाचे पोलीस अधिकारी हरिमोहन सिंग यांनी रविवारी सांगितले की, शनिवारी रात्री राष्ट्रीय महामार्गावर अनेक वाहन चालकांकडून बेकायदेशीर वसुली झाल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर या व्यक्तीला सापळा रचुन बेकायदेशीर वसुली करताना रंगेहात पकडण्यात आले आणि त्याला अटक करण्यात आली.  हा 180 किलोचा व्यक्ती पोलीस निरीक्षक असल्याचे सांगुन राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या वाहनांकडून वाहन जप्त करू अशी धमकी देऊन अवैध वसुली करत असल्याचे सांगण्यात आले.

सोशल मीडियावर या बहुरूपी पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पोलिसांचा गणवेश घातलेला एक व्यक्ती सांगत आहे की, त्याचे नाव मुकेश यादव आहे, तो गाझियाबादचा रहिवासी आहे आणि टोल टॅक्स वाचवण्यासाठी तो पोलिसाचा गणवेश घालतो. एवढेच नाही तर तो व्यक्ती बनावट पोलीस बनून वाहनांकडून अवैध वसुलीही करतो.

हा प्रकार टुंडला पोलिसांना कळताच त्यांनी लगेच या 180 किलोच्या माणसांला अटक करून त्यांची रवानगी ही कारागृहात केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे वजन 180 किलो असल्याचा पोलिसांचा दावा आहे. आता त्या व्यक्तीचा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर वापरकर्ते मजेदार कमेंट्स देखील करत आहेत.

हेही वाचा: Video : सॉरी म्हणत दिनेश कार्तिकने लाइव्ह मॅचमध्ये कोहलीची मागितली माफी; वाचा प्रकरण

या 180 किलोचा बहुरूपी पोलीस निरीक्षक आरोपी मुकेशकडून दोन आधारकार्ड, दोन पॅनकार्ड, पोलिसांचा गणवेश, बनावट आयकार्ड, एटीएम आदी कागदपत्रांशिवाय एक वॅगनआर कारही जप्त करण्यात आली असून, त्यावर 'पोलिस'चे मोठे स्टिकर लावण्यात आले होते. यादरम्यान त्याचे दोन साथीदारही होते, ज्यांच्या मदतीने तो खासगी बस आणि ट्रक तपासण्याच्या नावाखाली अवैध वसुली करत असे. टुंडला चे Co हरिमोहन सिंग यांनी सांगितले की, आरोपीची चौकशी सुरू आहे. त्याच्या टोळीत किती लोक सामील आहेत, याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

टॅग्स :policeVideoviral video