Viral video: बोलो तारा रारा! पोलिसाचा फिल्मी स्वॅग...भन्नाट व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच

पोलिसाने हटके अंदाजात नो पार्किंगसाठी गाणं म्हणत जागृकता पसरवली आहे
Viral video
Viral videoesakal

Viral Video News: रस्त्याच्या कडेला नो पार्किंग लिहीलं असतानाही तेथे आवर्जून गाडी लावणारे तुम्ही आम्ही सगळ्यांनीच अनेकवेळा बघितलेत. पोलिसांच्या अनेक सूचनांनंतरही लोक नो पार्किंग झोनमध्ये गाडी लावतात. आणि मग गाड्या जप्त केल्या की असा राडा करतात की पोलिसांनाही संताप होतो. यावर एका पोलिसाने हटके अंदाजात नो पार्किंगसाठी गाणं म्हणत जागृकता पसरवली आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होतोय.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक पोलीस रस्त्यावर माईक हातात पकडत 'बोलो तारा रा रा...' हे गाणं म्हणताना दिसतोय. तुम्ही हे गाणं लक्षपूर्वक ऐकल्यास तुम्हाला हे गाणं बोलो ता रा राच्या सुरात नो पार्किंगसंबंधी असल्याचं दिसेल. मेरी गड्डी को क्रेन ले गई ...बोलो तारा रा रा अशा सुरात गाणं म्हणतोय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पोलिसाचा व्हिडीओ दीपांशु काबरा या IPS अधिकाऱ्याने शेअर केलाय. त्यांनी या व्हिडीओला कॅप्शनही 'बोलो तारा रा रा' असं दिलंय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर होताच भन्नाट व्हायरल झालाय. त्याच्या या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com