

Viral Video Delhi Pollution
esakal
Air Pollution Protest Video Delhi : फुटबॉलचा बादशाह सुपरस्टार लिओनेल मेस्सी मागच्या दोन दिवसांपासून भारत दौऱ्यावर होता. तामीळनाडूनंतर मुंबई आणि त्यांनतर काल दिवसभर मेस्सी दिल्लीत होता. यावेळी सोमवारी काल (ता.१५) संध्याकाळी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर फुटबॉल सुपरस्टार लिओनेल मेस्सीसोबत मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता मेस्सीच्या स्वागताला स्टेडीयमवर पोहोचल्यानंतर त्यांना एका नामुष्कीजणक घटनेला सामोरे जाण्याची वेळ आली. दिवसभर दाट धुके सामना करत मेस्सीच्या चाहत्यांनी "मेस्सी, मेस्सी" च्या घोषणा दिल्यानंतर अचानक स्टेडियममध्ये "AQI, AQI" च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.