
हत्तीने तरुणीच्या नृत्याच्या तालावर डान्स केल्याने सर्वांचे लक्ष वेधले.
सोशल मीडियावर व्हायरल हा व्हिडिओ नेटकऱ्यांना वेड लावत आहे.
हत्ती आणि माणसातील अनोखी मैत्री या व्हिडिओतून दिसून येते.
Elephant Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक क्यूट व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका हत्तीने आपल्या अनोख्या नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओत एक तरुणी अतिशय लयबद्ध आणि सुंदर नृत्य करताना दिसत आहे, पण खरी मजा मागे उभ्या असलेल्या हत्तीच्या थिरकण्याने येते. हा हत्ती तिच्या नृत्याच्या तालावर आपली सोंड आणि शरीर हलवताना दिसतो, जणू तो तिच्या नृत्याचा जोडीदारच आहे.