Viral Video Girl: मेट्रोमध्ये उधळले रंग तर स्कूटरवर स्टंट, दोन्ही मुली सापडल्या...वाचा काय म्हणाल्या...

Viral Video Girl: स्कूटरवर स्टंट, दिल्ली मेट्रोत डान्स करणाऱ्या मुलींचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
Viral Video Girl
Viral Video Girlesakal

Viral Video Girl: स्कूटरवर स्टंट, दिल्ली मेट्रोत डान्स करणाऱ्या मुलींचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. या मुलींना स्कूटरवर स्ंटट केल्यामुळे पोलिसांनी ३३ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. आम्ही कुठलाही स्टंट करत नव्हतो तर रील बनवत होतो. आम्ही कान पकडून माफी मागतो. एवढे मोठे चलान आम्ही भरू शकत नाही. आमच्याकडे तेवढे पैसे नाहीत. भविष्यात असे करणार नाही, अशी प्रतिक्रिया दोन मुलींनी दिली आहे.

ह्या दोन मुली नोएडातील आहेत. या मुलींचा स्कूटरवर स्टंटबाजी करत अश्लील रीतीने होळी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दरम्यान या मुलींनी आज तकशी संवाद साधला आहे. या मुलींचे नाव प्रती आणि विनीता आहे. तर स्कूटर पियुष चालवत होता. दुसऱ्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये रील बनवताना स्कूटरवरून पडलेल्या मुलीचे नाव प्रीती आहे. याच मुलींचा दिल्ली मेट्रोतील व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. एकून तीन व्हिडिओ या मुलींनी केले आहेत.

दिल्ली मेट्रोत होळी खेळताना आक्षेपार्ह डान्स-

दिल्ली मेट्रोत होळी खेळताना आक्षेपार्ह डान्स करताना एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ एआय एडिटेड किंवा फेक असल्याची चर्चा होती. मात्र प्रीती आणि विनीता ने सांगितले त्यांनी हा व्हिडिओ शूट केला आहे. लोकांना वाईट वाटले तेव्हा आम्हाला वाटले की असं करायल नको होतं.

प्रीतीने सांगितले की ती फक्त रील बनवण्यासाठी दिल्लीत राहते. तिचे वडील गरीब आहेत, त्यामुळे ती शिकत नाही. तिला लहान भाऊ देखील आहे. ती उत्तराखंडची रहीवाशी आहे. दोन वर्षापूर्वी रील बनवण्यास सुरुवात केली. आधी ती हरियाणामध्ये राहत होती. तेव्हा ती एकटी व्हिडिओ बनवत होती. आता ती नोएडात राहते. आठ महिन्याआधी तिचे पियूष सोबत लग्न झाले आहे.

प्रीतीचे इंस्टाग्रामवर साडेतीन लाख फॉलोअर्स आहेत. तर युट्यूबवर साडेआठ लाख फॉलोअर्स आहेत. ती विनीताला १५ दिवसांपूर्वी भेटली आहे. 

विनीता काय म्हणाली?

मी दोन वर्षापासून व्हिडिओ बनवत आहे. इन्स्टाग्रामवर माझी प्रीती सोबत ओळख झाली.  आमच्यातील बाँडिंग इतके चांगले झाले आहे की आम्ही रोमान्सचे व्हिडिओही बनवतो. 

Viral Video Girl
Girija Oak: जागतिक रंगभूमी दिनी गिरिजा ओकने केली नाटकाची घोषणा; 'या' दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com