Viral Video : हॉर्ट अटॅकने तडफडून कामगाराचा गेला जीव, मोबाईलवर व्यस्त मालकाने ढुंकूनही बघितले नाही; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल संताप

Viral Video : व्हिडिओमध्ये कामगार वेदनेने तडफडताना आणि मदतीसाठी धडपडताना दिसतो. त्याचवेळी दुकानाचा मालक मोबाईलवर बोलत बसलेला दिसतो आणि कोणतीही मदत करत नाही.या असंवेदनशील वागणुकीवर सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
A tragic moment captured in a viral video from Agar Malwa, Madhya Pradesh, showing a worker suffering a fatal heart attack while his employer continues talking on the phone, ignoring him.

A tragic moment captured in a viral video from Agar Malwa, Madhya Pradesh, showing a worker suffering a fatal heart attack while his employer continues talking on the phone, ignoring him.

esakal

Updated on

मध्य प्रदेशातील आगर मालवा जिल्ह्यात, एका दुकानात काम करत असताना एका कामगाराला हृदयविकाराचा झटका आला. वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. जर त्याला वेळेवर रुग्णालयात नेले असते तर कदाचित त्याचा जीव वाचला असता. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्यानंतर कामगार वेदनेने तडफडत असल्याचे दिसून आले आहे, तर दुकान मालक त्याला मदत करण्याऐनवी आरामात बसून मोबाईल फोन बोलत असल्याचे दिसत आहे. मालकाच्या असंवेदनशीलतेवर सोशल मीडियावर खूप टीका होत आहे.

माहितीनुसार आगर मालवा जिल्ह्यातील सुसनेर भागात ही हृदयद्रावक घटना घडली. या व्हायरल व्हिडिओमध्ये केवळ एका कामगार अचानक कार्डियाक अटॅकमुळे जागीच मृत्युमुखी पडल्याचे दिसत आहे, हा व्हिडिओ व्हायरल होताच कामाच्या ठिकाणी जबाबदारीबद्दलही अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या ६ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये, एक कामगार नेहमीप्रमाणे कामात व्यस्त असताना तो अचानक खुर्चीवर बसला अन् नंतर तो उठलाच नाही. त्याचे सहकारी त्याला उठविण्याचा प्रयत्न करु लागले पण तो फोल ठरला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com