Viral Video: बेघर व्यक्तीनं भटक्या कुत्र्यांचा साजरा केला बर्थडे; व्हिडिओ पाहाल तर व्हालं भावूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video_Dogs Birthday

Viral Video: बेघर व्यक्तीनं भटक्या कुत्र्यांचा साजरा केला बर्थडे; व्हिडिओ पाहाल तर व्हालं भावूक

नवी दिल्ली : सध्याच्या काळात कारुण्य हा शब्दच दुर्मिळ बनला आहे. पण ही सर्वात सुंदर गोष्ट आहे की अद्यापही काही लोकांमध्ये ही भावना टिकून आहे. याचाच एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत असं काय आहे? हे तुम्ही विचाराल... तर एक बेघर व्यक्ती रस्त्यावरील दोन कुत्र्यांचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. हा वाढदिवस तो खूपच आनंदानं केक कापून साजरा करतोय, त्यामुळं हा व्हिडिओ पाहून तुम्ही भावूक व्हालं. (Viral Video Homeless person celebrates birthday of stray dogs you will be emotional)

हा व्हिडिओ Balanco नावाच्या ट्विटर युजरनं शेअर केला असून यामध्ये एक बेघर व्यक्ती पायऱ्यांवर आपले मित्र असलेल्या दोन भटक्या कुत्र्यांसह बसलेला दिसतो आहे. आपल्या या मुक्या दोन मित्रांच्या डोक्यावर त्यानं बर्थडेच्या कॅप घातल्या आहेत. यानंतर हा तरुण आपल्या बँगेतून केक आणि दोन प्लेट बाहेर काढतो, त्यावर कँडल्स ठेवतो. या कँडल पेटवून तो हॅपी बर्थडे गाणं गाताना दिसतोय. यानंतर दोन्ही कुत्र्यांना तो किस करतो आणि दोघांसाठीही केक कापतो. हे खरंच हृदयाला भिडणारं आहे. बेघर तरुणाच्या या कृतीचा व्हिडिओ एका व्यक्तीनं शूट केला आहे.

हेही वाचा : कर्ज परतफेडीच्या नियोजनाचे पाच मार्ग...

देशात खरोखर असे काही लोक आहेत ज्यांच्यामुळं तुम्हाला अभिमान वाटतो. याचा अंदाज तुम्ही या व्हिडिओवर आलेल्या कमेंट्समधून पाहू शकता. या व्हिडिओला ४.५ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. नेटिझन्सनी या तरुणामधील करुणा आणि प्रेमाचं आपल्या कमेंट्समधून कौतुक केलं आहे. एकानं तर लिहिलं की, अशाच लोकांमुळं जीवन हे सुंदर होत असतं. एकानं फक्त इतकंच म्हटलंय की, हा व्हिडिओ पाहून मी रडलो नाही, तुम्ही?