
पती-पत्नीमध्ये अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणे होतात. कधी छोट्या छोट्या गोष्टीवरून तर कधी मोठ्या गोष्टीवरून, पण कधीकधी हे भांडण इतके वाढते की ते सोडवणे खूप कठीण होते. उत्तर प्रदेशातील आग्रा येथून अशाच एका भांडणाची घटना समोर आली आहे.पत्नीशी भांडणानंतर तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तरुण फ्लायओव्हरवर चढला आणि तिथून उडी मारण्याची धमकी देऊ लागला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.