Deer Outsmarts Leopard in Dramatic Escape
esakal
Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून हसू येतं, तर काही मनाला भावतात. मात्र, काही दृश्यं अशी असतात, जी पाहून आपणही थक्क होतो. सध्या असाच एका हरणाचा आणि बिबट्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. यात बिबट्या हरणाची शिकार करण्यासाठी त्याच्या मागे धावताना दिसतो. पण ऐनवेळी हरणाने अशी काही चाल खेळली की, बिबट्याचाही डाव फसतो. हरणाची ही चतुराई पाहून नेटकरीही आश्चर्य व्यक्त करत आहेत.