
Shimla Leopard Cub Viral Video : हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील कोटखाई येथे एका स्थानिक व्यक्तीच्या संवेदनशील कृतीने बिबट्याच्या पिल्लाला नवे जीवन मिळाले आहे. थरोला गावात रस्त्याच्या कडेला झुडपांमध्ये थरथरत असलेले 20 ते 25 दिवसांचे बिबट्याचे पिल्लू अंकुश चौहान यांना आढळले. या पिल्लाची नाजूक अवस्था आणि जवळपास भटकणाऱ्या जंगली कुत्र्यांचा धोका पाहून अंकुश यांनी तात्काळ पाऊल उचलले. त्यांनी पिल्लाला आपल्या गाडीत सुरक्षित ठेवले आणि थेट थिऑग येथील वनविभाग कार्यालयात (DFO) पोहोचवले.