
सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका सिंहाने एका घरात प्रवेश केला आहे. हा व्हिडिओ गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील राजुला तालुक्यातील कोवाया गावातील असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये असे दिसते की एखाद्याच्या घराच्या स्वयंपाकघरात एक मोठा सिंह लपला आहे.