
तुम्ही अनेकदा पाहिले असेल की पर्यटन स्थळांवर किंवा धार्मिक स्थळी अनेक माकडे असतात, जे पर्यटकांचे मोबाईल फोन, पाकीट आणि इतर अनेक मौल्यवान वस्तू घेऊन पळून जातात. पर्यटक माकडांना केळी आणि इतर अनेक खाद्यपदार्थ देत राहतात. तरीही, माकडे हातात जे काही मिळेल ते घेऊन पळून जातात. सध्या उत्तरप्रदेशातील प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटस्थळ वृंदावनमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका माकडाने एका महिलेच्या पर्समधून १०,००० रुपयांच्या नोटांचा बंडल पळवला आणि नंतर ते माकड छतावर जाऊन बसले.