Mumbai Local Train Viral Video: मुंबई लोकलमध्ये पुन्हा महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झालाय. लोकलमधून प्रवास करत असताना जागेच्या वादावरुन एका पुरुषाने महिला प्रवाशाला अमानुष मारहाण केलीय. लोकलमध्ये गर्दी असताना हा धक्कादायक प्रकार घडलाय. महिलेला मारहाण करत असताना इतर लोक अडवत असतानाही या पुरुषाने महिलेला मारहाण करणं थांबवलं नाही. दरम्यान काही प्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओ शूट केला असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय.