Viral Video: Zomato Delivery Boyच्या अंगात घुसला मायकल जॅक्सन, भर रस्त्यात केलाय भन्नाट डान्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

viral video

Viral Video: Zomato Delivery Boyच्या अंगात घुसला मायकल जॅक्सन, भर रस्त्यात केलाय भन्नाट डान्स

ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लेटफॉर्म झोमॅटो हे वेगवेगळ्या कारणाने चर्चेत येत असते. अशात झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये डिलिव्हरी बॉयच्या डान्स स्टेप पाहून तुम्हालाही थिरकावंस वाटेल.

या वायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की झोमॅटो डिलिव्हरी बॉय आपल्या बाईकवरुन जात असतो मात्र अचानक तो आपली बाईक स्टँडवर लावतो आणि हेलमेट काढतो. त्यानंतर तो रस्त्याच्या मध्यभागी जात नाचायला सुरवात करतो. झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या डान्स स्टेप इतक्या भारी असतात की प्रत्येक जण त्याच्या डान्सचा आनंद घेताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहे.

हेही वाचा: Zomato: 50 टक्क्यांनी वाढतील झोमॅटोचे शेअर्स, तज्ज्ञांना विश्वास…

झोमॅटोच्या शेअर्समध्ये तेजी

फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या शेअर्समध्ये तेजीचे पुनरागमन झाले आहे. सप्टेंबरच्या तिमाहीतील कंपनीच्या चांगल्या निकालांमुळे शुक्रवारी झोमॅटोच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली. झोमॅटोचे शेअर्स 13.60% वाढून शुक्रवारी 72.65 रुपयांवर बंद झाले. कंपनीच्या शेअर्सने इंट्राडेमध्ये 73.45 रुपयांचा उच्चांक गाठला. तर इंट्राडे लो 65.70 रुपये आहे.दसोब

हेही वाचा: Zomato: झोमॅटोचे शेअर्स एका दिवसात 14% पेक्षा जास्त वाढले

झोमॅटोची ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यूमध्ये वाढ

कंपनीच्या फूड डिलिव्हरी व्यवसायाचे ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यू (GOV) दरवर्षी 23 टक्के आणि सप्टेंबर तिमाहीत 3 टक्क्यांनी वाढले. सप्टेंबर तिमाहीत ऑर्डर्सची संख्या आणि सरासरी ऑर्डर्सची व्हॅल्यूया दोन्हीमध्ये वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.