

Viral Video
Sakal
Trending News: समुद्र प्रवास अविश्वसनीयपणे रोमांचक असतो. सर्वत्र दुरपर्यंत पाणीच पाणी हे खूपच भयावह असते. जेव्हा एखाद्याचा जीव धोक्यात असतो किंवा त्यांचे सामान वाहून जाते तेव्हा हा प्रवास आणखी भयानक बनतो. अशा प्रकारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो सर्वांनाच धक्का देतो. या व्हिडिओमध्ये लोकांचे सामान समुद्रात तरंगताना दिसत आहे. हा प्रकार थायलंडमध्ये घडल्याचा दावा केला जात आहे, जिथे अनेक पर्यटकांच्या बॅगा एका बोटीच्या वरच्या डेकवरून समुद्रात पडले.