

नागपूर : दारुच्या बिलात ३० रुपये अधिकचे लावल्यानं राग अनावर होऊन दोन मद्यपींनी बार चालकावर चाकू हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये घडला आहे. इथल्या जरीपटका पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. बारमधील सीसीटीव्ही तपासून पोलीस आरोपींची ओळख पटवत आहेत.