

Pune Viral Video : पुणे शहर हे खोचक पाट्यांसाठी जसं प्रसिद्ध आहे, तसंच इथली इरसाल अस्सल पुणेरी माणसांसाठी देखील! कारण याचा प्रत्यय नुकताच डेक्कन परिसरात पाहायला मिळाल. एका पुणेरी काकूंनी चक्क एका कारचालकाला जन्माचा धडा शिकवला. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे, या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी या काकूंना आपला पाठिंबा असल्याचंही म्हटलंय.