

A massive python in Wayanad, Kerala attempting to cross the road after swallowing a full-grown deer, leaving locals stunned.
esakal
केरळच्या वायनाड जिल्ह्यात लोकांना थक्क करणारे दृश्य घडले.रस्त्यावर अचानक एक प्रचंड अजगर दिसला. त्याने एका मोठे हरीण गिळले होते आणि त्यामुळे त्याला हलताही येत नव्हते. अशातच ते अजगर रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. या जंगली मार्गावर वन्य प्राणी सामान्य आहेत, अख्ख हरीण गिळलेले अजगर पाहून मात्र लोकांची बोबडीच वळली.