Viral Video: रामदेव बाबांनी चालवली 'लँड रोव्हर डिफेंडर १३०' ; नेटकरी म्हणतात, "देशी - देशी बोलून..."

गाडीला नंबर प्लेट नाही, त्यामुळे एसयूव्हीचे मालक बाबा आहेत की नाही या बाबत खात्रीशीर माहिती नाही.
Baba Ramdev
Baba RamdevSakal
Updated on

बाबा रामदेव पुन्हा चर्चेत आले आहेत. विशेष म्हणजे यावेळी तो आपल्या कोणत्याही वक्तव्यामुळे किंवा योगासनांमुळे नाही तर भव्य लँड रोव्हर डिफेंडर १३० चालवल्यामुळे चर्चेत आहेत. ते अलीकडेच ही नवीन एसयूव्ही चालवताना दिसले. ऑटो वारने इंस्टाग्रामवर बाबांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते डिफेंडर १३० चालवताना दिसत आहे. गाडीला नंबर प्लेट नाही, त्यामुळे एसयूव्हीचे मालक बाबा आहेत की नाही या बाबत खात्रीशीर माहिती नाही.

बाबा रामदेव यांना लँड रोव्हर डिफेंडर १३० चालवताना पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरनं लिहिलं - हा बाबा नाही, तो भारतातील १७ वा सर्वात श्रीमंत माणूस आहे. एकाने लिहिलं - देशी-देशी बोलून विदेशी कार बाबा चालवत आहे., तर एक युजर म्हणतो- लोकांना देशी चूर्ण खायला घालून नोटा छापत आहेत.

Baba Ramdev
Baba Ramdev News : बाबा रामदेव १०० तरुण-तरुणींना देणार संन्यास; अमित शाह, CM योगी राहणार उपस्थित

इंडिया टाईम्सच्या वृत्तानुसार, बाबा रामदेव करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत. काही दिवसांपूर्वी, त्यांनी महिंद्रा XUV700 ही गाडी खरेदी केली होती, ज्याचा व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला आणि व्हायरल झाला. माहितीनुसार, बाबा जी लँड रोव्हर डिफेंडर १३० चालवताना दिसले ती कंपनीने फेब्रुवारी २०२३ मध्ये भारतात लॉन्च केली होती आणि अलीकडेच त्याची डिलिव्हरी सुरू झाली आहे.

Baba Ramdev
Trending News: चोर असला म्हणुनी काय जाहले...; हनुमान चालिसा म्हटली, दानपेटीत पैसे टाकले अन् पेटीच लुटली!

त्यात बसवलेलं इंजिन अतिशय मजबूत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे भारतीय बाजारपेठेत दोन इंजिन प्रकारांसह येते. पहिलं म्हणजे ३.०-लिटर पेट्रोल इंजिन (P400) जे 394 bhp पॉवर आणि 550 Nm टॉर्क जनरेट करते. तर 3.0-लिटर डिझेल इंजिन (D300) इंजिन येतं, जे 296 bhp पॉवर आणि 600 Nm टॉर्क निर्माण करते. दोन्ही इंजिन सौम्य-संकरित तंत्रज्ञानानं सुसज्ज आहेत, आणि ८ -स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहेत.

गाडीच्या आतमध्ये Apple CarPlay आणि Android Auto सह 11.4-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 4-झोन स्वयंचलित हवामान नियंत्रण प्रणाली, हीटिंग, कूलिंग आणि मेमरी फंक्शन्ससह इलेक्ट्रिकली ऍडजस्टेबल फ्रंट सीट्स, तसेच 360-डिग्री कॅमेरा मिळतो. याचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. त्याची सुरुवातीची किंमत १.३ कोटी रुपये एक्स-शोरूम आहे तर प्रीमियम प्रकारासाठी १.४१ कोटी रुपयांपर्यंत जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com