Couple Jumps into River for Viral Reel Without Life Jacket: सोशल मीडिया व्हायरल होण्यासाठी लोक स्वत:चा जीव धोक्यात घालायलाही मागेपुढे बघत नाहीच. अशाच काहीसा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत हे एक जोडपं एका नदीत उडी मारताना दिसतं आहे. विशेष म्हणजे लाईफ जॅकेट न घालता त्यांनी हा स्टंट केला. हा व्हिडीओ बघून कुणाच्या काळजाचा ठोका चुकू शकतो.