
Viral tiger fight video in national park: सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. प्राणी एकमेकांसोबत खूप मजा करतात. तुम्ही कुत्र्यांना एकमेकांशी भांडताना आणि खेळताना पाहिले असेल. त्याचप्रमाणे वाघ देखील एकमेकांसोबत मजेदारपणे भांडत असतात. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो नोटकऱ्यांना खुप आवडला आहे. या व्हिडिओमध्ये एक वाघ पाण्यात शांत बसला होता, नंतर त्याचा मित्र त्याला त्रास देण्यासाठी दबक्या पावल्याने आला आणि त्याच्या अंगावर उडी मारतो. काही लोक याला त्यांच्या आयुष्याशी जोडत आहेत की जेव्हा मी असा शांत बसलेला असतो तेव्हा लोक मला त्रास देण्यासाठी येतात. तर काहींना असे वाटले की दोघांमध्ये भांडण झाले आहे. पण ते फक्त मजेदार होते.