मुंबईची लाईफलाईन 'लोकल'मध्ये दररोज काही ना काही घडत असतं, कधी काही चांगल्या गोष्टी घडतात तर कधी भांडणं होतात. रोज लोकलमधील किस्से ऐकायला मिळतात. काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा होत असतात. अशातच आता एका लोकलमध्ये महिला आणि किन्नर यांच्यात जोरदार बाचाबाची झाली आणि पाहता पाहता ती थेट हाणामारीत बदलली. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.