
रेल्वेतील तिकीट क्लार्कबद्दल प्रवासी दररोज तक्रारी करत राहतात. कधी ते तिकीट उशिरा काढताना दिसतात तर कधी ते प्रवाशांना पैसे उकळताना दिसतात.कर्नाटकातील यादगीर रेल्वे स्थानकाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, लोक तिकीट खरेदी करण्यासाठी तिकीट काउंटरवर लांब रांगेत उभे आहेत. पण तिकीट क्लार्क त्यांच्याकडे लक्ष न देता फोनवर बोलण्यात मग्न असल्याचे दिसतो. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने या क्लर्कला निलंबित केले आहे.