

Players in Spain playing Billarda
esakal
How Billarda is Similar to Indian Vitidandu : युरोपमधील स्पेनमधील एका पारंपरिक खेळाची भारतात जोरदार चर्चा रंगली आहे. या खेळाचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. हे व्हिडिओ पाहून अनेकांना आपल्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत, कारण हा खेळ भारतातील पारंपरिक 'विटी-दांडू' या खेळाशी खूप मिळता जुळता आहे. 'बिलार्डा' म्हणून ओळखला जाणारा हा खेळ वायव्य स्पेनमधील गालिसिया भागात खेळला जातो; हा खेळ अत्यंत प्राचीन मानला जातो आणि त्याचे संदर्भ १३ व्या शतकापर्यंतचे असल्याचे सांगितले जाते.