
ताना तोराजातील गुहा अंत्यसंस्कार मृत्यूला उत्सवासारखे साजरे करतात.
ताऊ ताऊ पुतळे मृतांच्या स्मृती जपण्याचे प्रतीक आहेत.
ही परंपरा जीवन आणि मृत्यू यांच्याविषयी अनोखा दृष्टिकोन देते.
Indonesia Video : इंडोनेशियातील ताना तोराजा येथील डोंगररांगांमध्ये लपलेलं एक अनोखं विश्व आहे, जिथे जीवन आणि मृत्यू यांचा उत्सव थक्क करणाऱ्या पद्धतीने साजरा केला जातो. येथील प्राचीन परंपरेनुसार मृत्यू हा अंत नसून एका नव्या प्रवासाची सुरुवात मानला जातो. या डोंगरांमधील गूढ गुहांमध्ये मृतदेहांना विश्रांती दिली जाते जिथे ‘ताऊ ताऊ’ नावाच्या लाकडी पुतळ्यांचे आत्मे त्यांचे रक्षण करतात. ही परंपरा केवळ रिवाज नाही तर तोराजन लोकांच्या जीवनदृष्टीचा एक गहन पैलू आहे.