
लखनऊच्या बिजनौर येथील मोलकरीण दहा वर्षांपासून भांड्यांवर लघवी फवारत होती, जी घटना सीसीटीव्हीत कैद झाली.
कुटुंबाच्या संशयामुळे स्वयंपाकघरात बसवलेल्या कॅमेऱ्यांनी हे घृणास्पद कृत्य उघड केले.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोलकरीण पोलिसांच्या ताब्यात असून पुढील कारवाई तक्रारीवर अवलंबून आहे.
Bijnor Maid Spread Urine on Utensils CCTV Video Viral : लखनौच्या बिजनौर (नगीना) येथील एका प्रतिष्ठित व्यापारी कुटुंबाच्या घरात दहा वर्षांपासून काम करणाऱ्या मोलकरीणीच्या अमानवी कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या महिलेने स्वयंपाकघरातील भांड्यांवर लघवी फवारल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांमध्ये संताप आहे. या कुटुंबाने दहा वर्षांपासून त्या मोलकरीणीवर पूर्ण विश्वास ठेवला होता.