Video : धबधब्याला अचानक पूर आला अन् होत्याचं नव्हतं झालं! 6 तरुणी गेल्या वाहून, पुढे जे झालं....; पाहा धडकी भरवणारा व्हिडीओ

Bihar Waterfall Girls Video : बिहारमधील गयामधील लंगुरही धबधब्यावर अचानक पूर आल्याने सहा मुली वाहून गेल्या स्थानिक तरुणांनी धाडस दाखवत त्या सर्व मुलींना सुखरूप वाचवलं.
Bihar Waterfall Girls Video
Bihar Waterfall Girls Videoesakal
Updated on

Viral Video : बिहारमधील गयाजी जिल्ह्यातील इमामगंज ब्लॉक परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली. लंगुरही टेकडीजवळील धबधब्याला अचानक पूर आल्याने तिथे सहलीला गेलेल्या सहा मुली पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. धबधब्याच्या अचानक वाढलेल्या पाण्यामुळे काही क्षणांतच परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

पूराच्या पाण्याचा वेग इतका जबरदस्त होता की कोणालाही काही सुचण्याआधीच मुली पाण्याच्या प्रवाहात वाहत गेल्या. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही तरुणांनी मोठे धाडस दाखवत कोणतीही पर्वा न करता तात्काळ मदतीसाठी पुढे गेले. त्यांनी धबधब्याच्या जोरदार प्रवाहात जाऊन त्या मुलींना बाहेर काढण्याचा शर्थीने प्रयत्न केला आणि अखेरीस सर्व मुलींना सुखरूप वाचवण्यात यश मिळाले.

Bihar Waterfall Girls Video
Video : लोणी काळभोरमध्ये झळकले इराणचे झेंडे अन् खामेनींचे पोस्टर्स; खळबळजनक Video व्हायरल, तुम्हीही पाहून शॉक व्हाल..

या घटनेत एका मुलीला धबधब्याच्या प्रवाहात वाहत असताना डोंगरावरून वाहत आलेल्या दगडाने जोरदार धक्का बसला. त्यामुळे ती जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सुदैवाने इतर सर्व मुली सुरक्षित आहेत आणि त्यांना मोठा धक्का बसला असला तरी त्यांचे प्राण वाचले आहेत.

Bihar Waterfall Girls Video
Shubhanshu Shukla Video : अवकाशात पुन्हा एकदा फडकला तिरंगा! शुभांशु शुक्ला पोहोचले अंतराळ स्थानकात, पाहा अभिमानास्पद व्हिडिओ

या घटनेमुळे स्थानिक प्रशासनालाही सतर्क व्हावे लागले आहे. धबधब्यांसारख्या पर्यटन स्थळी सुरक्षेची अधिक आवश्यकता आहे, याची जाणीव या घटनेतून पुन्हा एकदा झाली आहे. वेळेवर मदत करणाऱ्या तरुणांचे स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com