
दिल्ली मेट्रोच्या रुळांवर मुलाने लघुशंका केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला
त्या लहान मुलाच्या वडिलांच्या निष्काळजीपणावर टीका होत आहे.
मेट्रो प्रशासनाने तपास सुरू केला असून नागरिकांना जबाबदार वर्तनाचे आवाहन करण्यात आले.
Delhi Metro Shocking Video : दिल्ली मेट्रो स्टेशनवर घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. मेट्रोच्या ट्रॅकवर एका लहान मुलाने लघुशंका केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यामुळे नागरी सभ्यता आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार करताना मुलाच्या वडिलांनी कोणतीही चिंता दाखवली नाही, ज्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.