

Viral river of snow in Himachal Pradesh's Pangi Valley after heavy snowfall ends dry winter. Watch Nikhil Saini's stunning video of ice river in Chamba amid 12+ inches fresh snow.
esakal
Viral Video : हिमाचल प्रदेशात निसर्गाचे एक रौद्र पण विलोभनीय रूप पाहायला मिळत असून खूप दिवसांपासून चाललेल्या कोरड्या हिवाळ्याचा अखेर शेवट झाला आहे. हिमालयाच्या कुशीत अचानक सुरू झालेल्या मुसळधार बर्फवृष्टीमुळे ओसाड डोंगरदऱ्या आता पांढऱ्याशुभ्र चादरीने ओढलेल्या वंडरलँडमध्ये रूपांतरित झाल्या आहेत. चंबा जिल्ह्यातील दुर्गम पांगी खोऱ्यात निसर्गाचा हा चमत्कार अनुभवण्यासाठी स्थानिक रहिवासी तयार असले तरी वाढत्या बर्फाचा सामना करणे आव्हानात्मक ठरत आहे.