

viral video
Sakal
viral video: लग्नसोहळा म्हणजे आनंद, उत्साह आणि आठवणींचा खास क्षण असतो. विधी सुरू असताना सगळे पाहुणे लक्ष देऊन मंगलाष्टका, मंत्रोच्चार आणि विधी पाहत असतात. पण कधी कधी असे काही घडते की संपूर्ण लग्नसोहळाच चर्चेचा विषय बनतो. असाच एक भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्नाचे विधी सुरू असतानाच अचानक अनपेक्षित पाहुणे मंडपात दाखल झाले आणि एकच गोंधळ उडाला. हे पाहुणे दुसरे तिसरे कोणी नसून थेट वानर सेना होती. मंडपात माकडांचा धुमाकूळ सुरू होताच वर–वधू, नातेवाईक आणि पाहुणे सगळेच गोंधळून गेले. हा मजेशीर आणि अनोखा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी देखील या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.