Three Men Seen Wearing Railway Sheet
esakal
Viral Video: रेल्वेच्या प्रवासात मिळणाऱ्या चादरी प्रवासी घरी घेऊन गेल्याच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो. पण आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे रेल्वेच्या चादरी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. या व्हिडीओत रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोट्याशा दुकानाबाहेर तीन जण रेल्वेची चादर अंगावर घेऊन अगदी निवांतपणे खरेदी करताना दिसत आहेत.