
Ceasefire: भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये युद्विरामाची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रयत्न केले आहेत, त्यांची स्वतः ट्विट करत दोन्ही देशांनी तात्काळ युद्धविरामासाठी मान्यता दिल्याचं घोषित केलं. या युद्धविरामाला किंवा युद्धबंदीला इंग्रजी भाषेत Ceasefire असं म्हणतात. हा खरंतर एक प्रकारचा करार असतो, जो तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीद्वारे किंवा साक्षीनं केला जातो. ज्या द्वारे अधिकृतरित्या दोन्ही बाजूंकडून कुठल्याही प्रकारचा गोळीबार किंवा हल्ल्यांचा प्रकार केला जाणार नाही, असं लिखित स्वरुपात मान्य केलं जातं.