
नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान संघर्ष टिपेला पोहोचलेला असताना दोन्ही देशांकडून तात्काळ युद्धविराम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. आमच्या दीर्घ चर्चेनंतर दोन्ही देशांनी हा निर्णय घेतला असल्याचं ट्विट ट्रम्प यांनी केलं आहे. तसंच यासाठी दोन्ही देशांचं त्यांनी अभिनंदनही केलं आहे. पण भारताकडून अद्याप यावर अधिकृतरित्या कुठलंही भाष्य करण्यात आलेलं नाही.