Viral Video : एकीचे बळ काय असते? हा व्हिडिओ एकदा पाहा म्हणजे कळेल; दहा पट मोठ्या...

हा व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जाईल
Viral Video
Viral VideoSakal

एकीचे बळ काय असते या विषयावर लहानपणी शाळेत असताना अनेक धडे आपण शिकलो आहोत. एखादं काम सगळ्यांनी मिळून केलं तर ते काम लवकर होतं किंवा एखाद्या कार्यामध्ये आपली एकजूट असली की त्याचा वेगळा प्रभाव पडत असतो. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला असून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एकीचे बळ काय असतं याची प्रचिती येईल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मत्यू पावलेली पाल मुंग्यांनी एका कुंडीत नेली आहे. सरळ असलेल्या कुंडीच्या भिंतीवरून त्यांनी आपल्या वजनापेक्षा दहापट जास्त वजन असलेल्या पालीला सहजरित्या वर नेलं आहे.

मध्ये एका ठिकाणी पाल खाली पडता पडता वाचते पण त्यातील काही मुंग्या या पालीला घट्ट धरून ठेवतात. एका मुंगीला अशक्य असणारी ही गोष्ट अनेक मुंग्यांनी एकत्रित येऊन केली आहे.

Viral Video
Har Ghar Tiranga : सोशल मीडियावरचा DP बदला; 'हर घर तिरंगा'वरून पंतप्रधान मोदींचे आवाहन

दरम्यान, मुंग्या आपल्यापेक्षा हजारो पट वजनाने जास्त असलेल्या सापाला किंवा दुसऱ्या एखाद्या जीवाश्माला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जाऊ शकतात कारण मुंग्या एकत्र येऊन हे काम करत असतात. एखादं काम एकत्रितपणे केलं तर त्याचा रिझल्ट काय असतो हे या व्हिडिओमधून आपल्याला समजेल. अनेकदा आपल्यालाही एखाद्या कामामध्ये एकीचं बळ दाखवण्याची वेळ येत असते.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या व्हिडिओला आपली पसंती दर्शवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com