Viral Video: अरेच्चा! पाहावं ते नवल, काळ्या कावळ्यांमध्ये पांढरा कावळा आला कुठून? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral video of white crow

Viral Video: अरेच्चा! पाहावं ते नवल, काळ्या कावळ्यांमध्ये पांढरा कावळा आला कुठून?

White Crow: प्रत्यकानेच कावळा हा पक्षी नक्कीच बघितला असेलच. काव काव करणाऱ्या कावळ्याचा रंग अगदी लहान मुलालाही विचारला तरी तो काळा असतो असेच सांगेल. मात्र व्हायरल व्हिडीओतील पांढरा कावळा बघून नेटकरीही हैराण झाले. व्हायरल होणारा हा पांढरा कावळा तुम्ही बघितलात काय?

सध्या सोशल मीडियावर पांढऱ्या रंगाचा कावळा चर्चेत आलाय. पांढऱ्या रंगाच्या कावळ्याचा व्हि़डीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होतोय.

पांढरे कावळे असतात का?

१९९८ मध्ये एका छायाचित्ररकाराने पांढऱ्या कावळ्याचे छायाचित्र कॅमेरामध्ये कैद केले होते. काही ठिकाणी काळपट पांढरे कावळेही दिसून येतात. व्हायरल झालेल्या व्हिडीओला मीलियन व्ह्यूज आले असून पांढऱ्या कावळ्याचे अनेकांना नवल वाटले. अनेकांनी हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलाय.