Viral News: वयाच्या 16 व्या वर्षी पुतिन यांच्यासोबत सेल्फी! स्वतःची कंपनी, वडिलांनाच देतो 2 लाख रुपये पगार; कोण आहे भारताचा 'AI Kid'?

Who Is Raul John Aju: वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत सेल्फी घेतल्याने केरळचा राउल जॉन अजू चर्चेत आला आहे. कोण आहे हा AI Kid जाणून घ्या.
Who Is Raul John Aju

16-Year-Old Indian AI Kid Raul John Aju Takes Selfie With Vladimir Putin, Pays His Father Rs 2 Lakh Salary

eSakal

Updated on: 

India's AI Kid Raul John Aju: बहुतेक मुलं ज्या वयात शाळेच्या परीक्षा, अभ्यास आणि सोशल मीडियामध्ये व्यस्त असतात, त्याच वयात 16 वर्षांच्या राउल जॉन अजूच्या आयुष्यात एक असा क्षण आला, ज्याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत सेल्फी घेण्याची संधी त्याला मिळाली.

मॉस्कोमध्ये आयोजित AI Journey 2026 या परिषदेदरम्यान राउलची पुतिन यांच्याशी भेट झाली. या भेटीनंतर त्याने इन्स्टाग्रामवर पुतिन यांच्यासोबतचा फोटो शेअर केला. राउलला भारतात 'AI Kid' म्हणून ओळखलं जातं.

Loading content, please wait...