

Why Dont Girls Propose To Boys Reason
ESakal
प्रेमाचा महिना अजून दोन महिने दूर आहे. या महिन्यात तुम्हाला अनेकदा लक्षात येईल की मुले मुलींना भेटवस्तू देतात. बहुतेकदा मुलांकडूनच प्रपोज येतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, नेहमी मुलेच मुलींना प्रपोज का करतात? मुली कधीच मुलांना प्रपोज का करत नाहीत? या प्रश्नाचे एक मजेदार उत्तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका रीलद्वारे दिले जात आहे. ज्यामध्ये एक मुलगी मुलींना प्रपोज करण्यासाठी पुढाकार का घेत नाही हे स्पष्ट करते.