Viral Video : नवरा GFसोबत बारमध्ये डान्स करत होता; बायकोने रंगेहात पकडलं अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : नवरा GFसोबत बारमध्ये डान्स करत होता; बायकोने रंगेहात पकडलं अन्...

नवराबायकोचं नात हे पवित्र असतं असं म्हणतात. पण अनेकजण आपलं लग्न झाल्यानंतरही दुसऱ्या व्यक्तीसोबत शारिरीक संबंध ठेवत असतात. तर सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक बायको आपल्या नवऱ्याला बारमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडताना दिसत आहे.

नवरा आणि त्याची गर्लफ्रेंड बारमध्ये एका गाण्यावर जबर डान्स करत असतात. म्युझिक सुरू असते. तेवढ्यात त्याची बायको येते आणि म्युझिक बंद होते. बायको नवऱ्याला पाहून चप्पल काढते आणि आपल्या नवऱ्यावर उगारते. नवऱ्याला या घटनेचा जाब विचारते पण नवरा काहीच बोलत नाही. बायकोचा हे चित्र पाहून आपला राग अनावर होतो.

त्यानंतर ती त्याला हाताने मारते आणि बारच्या बाहेर घेऊन जाते. सदर व्यक्तीची गर्लफ्रेंड बारमध्येच थांबलेली असल्याचं आपल्याला या व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्याला हसू आवरणार नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.